उल्का राऊत

"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.