तन्मय केळकर

तन्मय केळकर यांचा दिनांक ६ मार्च १९९१ रोजीचा जन्म असून त्यांनी सांगली येथील ‘वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ येथून बी.टेक-इलेक्ट्रोनिक्स ही पदवी प्राप्त केली आहे. व्यवसायाने ते २०१२पासून आय. टी. क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, अस्खलित संस्कृत, पंजाबी, गुजराती, बंगाली, प्राथमिक स्तरावरील उर्दू, फारसी, दारी अश्या भाषांवर त्यांचे प्राविण्य आहे. तसंच ग्रीक, रशियन, कन्नड, गुजराती या लीपींवरही त्यांनी प्राविण्य मिळवलं आहे.
विविध धर्म व संप्रदायांचा विशेषत: बौद्ध, इस्लामी, वैदिक तत्त्वज्ञान आणि शीख इतिहास यांचा तौलनिक अभ्यास करणं हा त्यांचा छंद आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण इत्यादी विषयांत त्यांचं अवांतर वाचन असून याविषयावर ते प्रासंगिक लेखन करतात.

लेखकाची पुस्तकं

मैत्री संस्कृतशी


तन्मय केळकर


हे पुस्तक कोणासाठी?
हसत-खेळत ‘enjoy’ करत संस्कृत शिकू / शिकवू इच्छिणा‍र्‍या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा फारशी ओळख नसली तरीही स्वागतच…!
पुस्तकाची वैशिष्ट्ये
* वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा
* ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न
* रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर
(एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.)
* नियमित म्हटल्या जाणार्‍या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ
* दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा
* संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’
* संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश



325.00 Add to cart