सुमेध वडावाला (रिसबूड)

श्रेष्ठ कथाकार ( दिवंगत ) के. ज. पुरोहित यांच्या नावाने, वर्षातल्या सर्वोत्तम कथेला दिला जाणारा 'शांताराम पुरस्कार' ; पहिल्याच वर्षी म्हणजे १९९ २ मध्ये वडावाला लिखित कथेला मिळाला आणि १९८६ पासून लेखनारंभ केलेल्या सुमेध वडावाला यांच्या प्रवासाकडे जाणकारांचं लक्ष वेधलं गेलं. नंतरच्या ३५ वर्षांत, त्यांची जवळपास ३५ पुस्तकं प्रकाशित झाली. कथासंग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन, ललितलेखन, आदी अनेक साहित्य प्रकारांच्या पुस्तकांत त्यांनी लिहिलेल्या 'आत्मकथा’ अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. समीक्षकांनी 'सामाजिक आगळीवेगळी वा कौटुंबिक मात्र चाकोरीबाह्य विषय' आणि 'अनवट, अवघड, शैली' ही त्यांच्या कथालेखनाची जी वैशिष्ट्यं सांगितली ती वैशिष्ट्यं त्यांनी लिहिलेल्या आत्मकथांतही दिसून येतात.'महाराष्ट्र शासन' , साहित्य परिषद ’ यांच्या पुरस्कारांसह , ‘श्री . दा . पानवलकर पुरस्कार' , ' राजेंद्र बनहट्टी पुरस्कार ’ , ‘ डॉ . अ . वा . वर्टी पुरस्कार '; आदी सोळा - सतरा पुरस्कारांनी त्यांच्या लेखनाच्या उच्च गुणवत्तेची जणू साक्ष दिली.'

लेखकाची पुस्तकं

मिट्ट काळोख …लख्ख उजेड

एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन…

दत्ता श्रीखंडेचा स्तिमित करणारा जीवन प्रवास


सुमेध वडावाला ( रिसबूड )


उजड काळोख्या वाटेवरून प्रवास करता करता प्रकाशाचे किरण दिसू लागतात काय आणि तो प्रवास एक एक अकल्पनीय वळसे घेत घेत उजेडाकडे झेपावतो काय…. लहानपणापासून दत्ता श्रीखंडेला असलेल्या व्रात्य सवयी अधिक व्रात्य संगती … त्याला जोड दुर्दैवी प्रसंगांची आणि प्रतिकूल परिस्थितीच… मग घरून पळून जाणं, कमाईसाठी लहान-सहान कामं करणं , तिथले खचवून टाकणारे अनुभव घेणं हे सर्व अपरिहार्यपणे आलंच. त्यातूनच मग दत्ता अवैध धंद्यांतील नोकरीत गुरफटत जातो आणि नकळतपणे अधोविश्वात प्रवेश करतो. चोऱ्या, पाकीटमारीचे धंदे, दारू – गर्दच्या व्यसनांचा विळखा, जेलच्या वाऱ्या अशा न संपणाऱ्या दुर्दैवी फेऱ्यांत दत्ता अडकून जातो . काळोख्या गल्ल्यांमधून प्रवास करता करता मिट्ट काळोखाच्या हमरस्त्यावर जाऊन पोचतो… पण एके दिवशी त्याला’ मुक्तांगण’ नावाचं मोकळं पटांगण सापडतं… आणि त्याला स्वतःमधल्याच नवीन दत्ताचा शोध घेण्याची संधी मिळते. मग सुरू होतो लख्ख उजेडाकडे जाण्याचा त्याचा प्रवास !

थक्क करणारी आत्मकथा – मिट्ट काळोख … लख्ख उजेड !



 

375.00 Add to cart