सोनिया कक्कर

सोनिया कक्कर या प्रसिद्ध आरोग्य आणि आहारतज्ज्ञ असून 'सानोफी' आणि 'ग्लॅक्सो' यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या त्या सल्लागार आहेत. त्या सिताराम भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि रीसर्च व दिल्लीतील इतर प्रख्यात हॉस्पिटलशी संलग्न आहेत. आहार आणि आरोग्य या विषयात त्यांनी बी.एस.सी आणि एम.एससी.ची पदवी प्रथम श्रेणी घेऊन मिळवली असून लेडी आयर्विंग कॉलेजमधून डॉक्टरेट मिळवली आहे. शैक्षणिक बुद्धिमत्तेसाठी त्यांना ‘श्रीमती भानुमती मेमोरियल पुरस्कार', 'डॉ.वाय. के. सुब्रह्मण्यम मेमोरियल पुरस्कार' आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चतर्फे सिनियर फेलो अर्वार्ड मिळालं आहे. ऑर्गनायझिंग कमिटी ऑफ दी इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन ( WDC ) २०१३ च्या सभासद म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी पोषक आहार, समृद्ध जीवनशैली आणि मानसिक सामाजिक व्यवस्थापन या विषयावर सध्या त्यांचं काम चालू आहे.

लेखकाची पुस्तकं

छोटे प्रभावी आरोग्य सल्ले


सोनिया कक्कर
अनुवाद :डॉ. अरुण मांडे


सुदृढ आरोग्य म्हणजे तंदुरुस्त शरीर व त्याला मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची असलेली जोड. म्हणजेच जर शरीर तंदुरुस्त असेल आणि तुमचं मन-चित्त प्रसन्न असेल तरच तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? डॉ. सोनिया कक्कर या पुस्तकाद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत व थोडक्यात ‘आरोग्यदायी जीवनशैली’चे विविध कानमंत्र देतात. जड वैद्यकीय भाषेत नसलेले छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे हे कानमंत्र आहेत.
रोजच्या आयुष्यात डोकावणार्‍या साध्या-सुध्या प्रश्नांची तसेच गंभीर प्रश्नांचीही चर्चा त्यांनी यात केली आहे. उदाहरणार्थ मधुमेहाची लक्षणं कशी ओळखावीत, तणावमुक्त कसं राहावं, औषधाचा बॉक्स अद्ययावत् का ठेवावा इथपासून ते डुलकी घ्यावी की नाही आणि योग्य ब्रश कसा निवडावा इथपर्यंत विविध समस्यांचा ऊहापोह त्यांनी केला आहे.
आरोग्याशी निगडित विविध समस्यांची सोपी उत्तरं देणारं आणि जीवनाकडे बघण्याची एक नवीन व निकोप दृष्टी देणारं पुस्तक…छोटे प्रभावी आरोग्य सल्ले!


125.00 Read more