श्री. के अक्षीकर

लेखकाची पुस्तकं

अनासक्त कर्मयोगी

( कै . गो . ना . अक्षीकरांचे चरित्र )

श्री . के . अक्षीकर


अनासक्त कर्मयोगी ‘ या चरित्राचे लेखक श्री श्रीकृष्ण केशव अक्षीकर हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील शिक्षण विभागातून सहसचिव या सन्मान्य पदावरून सेवानिवृत्त झालेले राजपत्रित अधिकारी आहेत . ते एक चांगले ललित लेखकही आहेत . आजवर त्यांची ‘ कन्सल्टिंग रूम ‘ केशव अक्षीकर ‘ आदरांजली ‘ , ‘ अशी ( ही ) माणसं ‘ , ‘ माझ्या मनातलं ‘ व ‘ रिकामपणाचे उपद्व्याप ‘ ही पाच ललित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . त्यांनी एके काळी ‘ सुगत ‘ या नावाने वासंतिक व दिवाळी अंकांचे संपादनही केले होते . या चरित्राचे नायक कै . गो . ना . अक्षीकर यांचे ते नातू आहेत . टिळक – आगरकरांच्या अध्यापनाचा लाभ घेत त्यांच्याच ‘ राष्ट्रीय ‘ शाळेतून मॅट्रिक झालेल्या कै . गो . ना . अक्षीकरांनी आपल्या या गुरुद्वयाकडून शिक्षणप्रसाराचा संस्कार कसा घेतला ; दादर , ठाणे व कल्याण या एके काळच्या मागासलेल्या ‘ खेड्यां मध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी कशा शाळा काढल्या , त्या काळात शिक्षणक्षेत्रात दुर्मीळ असणाऱ्या ‘ रात्रशाळा ‘ व ‘ इंडस्ट्रियल स्कूल ‘ या संकल्पना कशा प्रत्यक्षात आणल्या , हे सर्व करीत असताना देणग्यांवर अवलंबून न राहता स्वत : च आर्थिक पदरमोड कशी केली , यश , कीर्ती , नाव आणि स्वतःचे छायाचित्रही यांपासून ते निष्ठेने कसे अलिप्त राहिले , यांचे एक हृद्य व प्रेरणादायी चित्र या चरित्रात पाहवयास मिळते . योगायोगाने कै . गो . ना . अक्षीकर सुवर्णजयंती वर्ष आणि त्यांनीच स्थापन केलेल्या दादर – मुंबईच्या छबिलदास शाळेची शतकोत्तर रजतवर्षपूर्ती या २०१४ त येणाऱ्या दोन मंगल मुहूर्ताच्या उंबरठ्यावर हे चरित्रपुस्तक प्रकाशित होत आहे . याच्या वाचनाने शिक्षणक्षेत्रातील मंडळींना कार्यऊर्जा प्राप्त व्हावी आणि विद्यार्थ्यांवर ध्येयासक्ती व अनासक्तीचा संस्कार व्हावा , हीच एक इच्छा .

– डॉ . द . दि . पुंडे


125.00 Add to cart

विरंगुळा

 

श्री.के. अक्षीकर


आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत : साठी वेळ काढणं , छंद जोपासणं यासाठी वेळ असतो कुठे ? त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते ! श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं ! त्यांचा हा छंद म्हणजे लेखन ! बारा लेखांच्या या संग्रहात दैनंदिन जीवनातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , ओघवती लेखनशैली व परिपक्व वैचारिक बैठक याची प्रचीती येते .


100.00 Add to cart