शीतल कक्कर मेहरा

शीतल कक्कर - मेहरा या कॉर्पोरेट सभ्याचारपद्धती ( Etiquettes ) आणि आंतरराष्ट्रीय शिष्टाचार या क्षेत्रांत तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात . आतापर्यंत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त एक्झिक्युटिव्हज्ना या विषयावर मार्गदर्शन केलं आहे . अॅक्सेन्च्युअर , आदित्य बिर्ला ग्रुप , बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच , अनेंस्ट अँड यंग इंडिया , जॉन्सन अँड जॉन्सन आणि केपीएमजी अशा प्रसिद्ध कंपन्यांमधील अधिकाऱ्यांना त्यांनी ट्रेनिंग दिलं आहे . विविध बिझनेस मॅगझिन्स व वृत्तपत्रांसाठी त्यांनी विपुल लेखन केलं आहे . ' इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रासाठी त्या गेले चार वर्ष सदरलेखन करत आहेत . इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैद्राबाद , IIM - बंगळुरू आणि IIM - लखनौ या संस्थांमध्ये व इतर काही नावाजलेल्या बिझनेस स्कूलमध्ये त्या अतिथी अध्यापक म्हणून काम करतात .

लेखकाची पुस्तकं

व्यवसायातील इंप्रेसिव्ह मॅनर्स

व्यवहारात आपली छाप पाडण्यासाठी वागण्या-बोलण्याच्या प्रभावी पध्दती – सेल्स, मार्केटिंग, एच.आर., इंटरव्ह्यू, बिझनेस, कॉर्पोरेट, मिटिंग्ज, कॉकटेल्स, डिनर


शीतल कक्कर मेहरा
अनुवाद :मेधा ताडपात्रीक


सेल्स, मार्केटिंग किंवा बिझनेस… तुम्ही कोणत्याही क्षेत्रांत कार्यरत असलात तरी प्रभावीपणे संवाद साधता येणं हे व्यावसायिक यशासाठी अत्यावश्यक असतं. तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा समोरच्यावर परिणाम होत असतो. तुमच्या केवळ एका हस्तांदोलनातून किंवा अगदी दहा मिनिटांच्या भेटीतूनही तुम्हाला व्यवसायातल्या सुवर्णसंधी मिळू शकतात!
तुमच्या कामाच्या ठिकाणी वागण्या-बोलण्यातून विशेष ठसा उमटवण्यासाठी आवश्यक अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
उदाहरणार्थ…
हस्तांदोलन कसं करावं
बिझनेसकार्डची देवाणघेवाण कशी करावी
आपल्या ग्राहकाच्या स्मरणात व संपर्कात कसं राहावं
सहकारी, ग्राहक व बॉस यांच्याबरोबर कशाप्रकारचं वर्तन ठेवावं…
मिटिंगमध्ये किंवा बिझनेसपार्टीमध्ये काय व कसं बोलावं
क़ॉन्फरन्समध्ये किंवा बिझनेस इव्हेंट्सला जाताना वेषभूषा, केशरचना, अ‍ॅक्सेसरीज, पादत्राणं कशी असावीत
टेक्नॉलॉजीच्या साधनांद्वारे (इ-मेल, टेलि व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद कसा साधावा, इ.इ.
आपलं करिअर ‘प्रभावित’ करणार्‍या अशा सर्व कळीच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करणारं पुस्तक… व्यावसायिक इंप्रेसिव्ह मॅनर्स!


250.00 Add to cart