रवींद्र शोभणे

मराठी साहित्यक्षेत्रात कथाकार, कादंबरीकार, समीक्षक म्हणून सुपरिचित आजवर जवळजवळ तीस पुस्तकांच लेखन त्यात विशेषतः कादंबरी आणि कथा या प्रांतात अधिक लक्षवेधी लेखन. ‘कोंडी’, ‘उत्तरायण’, ‘पडघम’, ‘अश्वमेध’, ‘होळी’, ‘पांढर’ इत्यादी कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय. ‘वर्तमान’, ‘दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘तद्भव’, ‘चंद्रोत्सव’, ‘ओल्या पापाचे फुत्कार’, ‘भवताल’ इत्यादी कथासंग्रह ‘महाभारताचा मूल्यवेध’, ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे, सत्त्वाशोधाच्या दिशा’, ‘संदर्भासह’, ‘त्रिमिती’ ही समीक्षणात्मक पुस्तके, ‘गोत्र’ हे व्यक्तिचित्रणं अशी त्यांची काही पुस्तके सांगता येतील. ‘पडघम’, ‘अश्वमेध’ आणि ‘होळी’ ही त्यांची राजकीय, सामाजिक त्रयी म्हणून विशेष उल्लेखनीय. त्यांच्या लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन ‘वाङ्मय पुरस्कारांसह’, ‘लोकमत पुरस्कार’, ‘रणजित देसाई पुरस्कार’, ‘अ. वा. वर्टी पुरस्कार’, ‘आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार”, ‘शांताराम कथा पुरस्कार’, ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्य आणि संस्कृती प्रतिष्ठानचा पुरस्कार’, ‘महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार’, लाभशेटवार प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ इत्यादी मानाचे मिळाले आहेत. पुरस्कार

सद्यकालीन समाजवास्तवाच्या विविध स्तरांचा सम्यक आणि तटस्थ शोध घेत त्यातील विविध ताणतणावांचा, प्रश्नांचा शोध घेत त्यामागील माणसाच्या वर्तनाचा, त्याच्या अंतर्बाह्य संघर्षाचा आणि त्याच्या भावविश्वाला मुळापासून हादरवून सोडणाऱ्या भवतालाचा आलेख मनःपूर्वकपणे आणि कलात्मक तटस्थाने मांडणे ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. प्राक्कथांचा, आर्ष महाकाव्याचा समकालाशी अन्वय शोधण्याची त्यांची लेखनप्रकृती विशेष उल्लेखनीय अशी आहे.

अमळनेर येथे होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शोभणे यांची निवड झाली आहे.

लेखकाची पुस्तकं

सॉक्रेटिस कधी मरत नसतो

 


माधव कौशिक

भावानुवाद :रवींद्र शोभणे


हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.

कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो.

मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे.

मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह…. 

240.00 Add to cart