कुलदीप नय्यर

पत्रकार, लेखक, राजनैतिक अधिकारी आणि संसदपटू म्हणून ख्यातनाम असलेल्या कुलदीप नय्यर यांचा जन्म सियालकोट इथे १९२४ मध्ये झाला. सियालकोटमधील मरे कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. तर लाहोरच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. नंतर त्यांनी एन्व्हान्स्टन इथल्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीतून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गोविंद वल्लभ पंत आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. इंग्लंडमध्ये ते भारताचे उच्चायुक्त होते आणि नंतर राज्यसभेचे सदस्यही होते. एक अभ्यासू संसदपटू म्हणून त्यांनी राज्यसभा गाजवली. यू.एन.आय. आणि पी.आय.बी. या वृत्तसंस्थांत आणि 'स्टेट्समन 'व 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रांत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. लंडन येथील 'द टाइम्स'चे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून त्यांनी २५ वर्ष काम पाहिलं. त्यांचा स्तंभ जगातील ८० नियतकालिकांत एकाच वेळी प्रसिद्ध होत असे.

लेखकाची पुस्तकं

शहीद

भयमुक्त होऊन मरणाला कवेत घेणार्‍या भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा जीवनप्रवास…

पत्रकार, लेखक, राजनैतिक अधिकारी आणि संसदपटू म्हणून ख्यातनाम असलेल्या कुलदीप नय्यर यांचा जन्म सियालकोट इथे १९२४ मध्ये झाला. सियालकोटमधील मरे कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. तर लाहोरच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. नंतर त्यांनी एन्व्हान्स्टन इथल्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीतून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गोविंद वल्लभ पंत आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. इंग्लंडमध्ये ते भारताचे उच्चायुक्त होते आणि नंतर राज्यसभेचे सदस्यही होते. एक अभ्यासू संसदपटू म्हणून त्यांनी राज्यसभा गाजवली. यू.एन.आय. आणि पी.आय.बी. या वृत्तसंस्थांत आणि 'स्टेट्समन 'व 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रांत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. लंडन येथील 'द टाइम्स'चे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून त्यांनी २५ वर्ष काम पाहिलं. त्यांचा स्तंभ जगातील ८० नियतकालिकांत एकाच वेळी प्रसिद्ध होत असे.

अनुवाद :
पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.

केवळ तेवीस वर्ष वय असलेल्या भगत सिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण ‘माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही’ ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र-चळवळीची ज्वाला अधिकच पेटून उठली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून, आणि प्रकाशात न आल्या कागदपत्रांचा शोध घेऊन, संशोधनकार ज्येष्ठ व विख्यात पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. यात भगत सिंग यांच्यावर मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंताचा असलेला प्रभाव, त्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी, धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आदी गोष्टीच नय्यर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे. भगत सिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या उटल्याचा तपशीलवार वर्णन असून हंस राज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार राहण्याबाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आले आहेत तसंच यात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगत सिंग याच विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले, हेही नय्यर यांनी यात यष्ट केलं आहे.
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका स्वातंत्र्यसैनिकाची धगधगती क्रांतिगाथा शहीद!

300.00 Add to cart