हर्षा भोगले

भारतीय क्रिकेटचा ‘चेहरा आणि आवाज’ म्हणून हर्षा भोगले यांना जगन्मान्यता आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या दैवी देणग्यांचा व्यावसायिक वापर करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. ते एक केमिकल इंजिनियर, देशातील अव्वल व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आयआयएम अहमदाबादचे पदवीधर असून याशिवाय ते प्रसिद्ध प्रश्नमंजुषाकार, अॅअड एक्सिक्युटिव्ह, ‘हर्षा की खोज’ या रिअॅ लिटी शोचे होस्ट, उत्तम टीव्ही प्रेझेंटर, जगप्रसिद्ध असलेला उत्तम समालोचक, चर्चासत्रांचे नियंत्रक, कॉर्पोरेट स्पीकर आणि खेळावर प्रेम करणारे, त्यातलं नाट्य आणि नाट्यातल्या कलाकारांवर लिहिणारे लेखक... म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
त्यांनी आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. २००८ साली ‘क्रिकइन्फो’ने घेतलेल्या जागतिक मतदानात त्यांना ‘सर्वोत्तम समालोचक’ असा किताब मिळाला आहे. १९९५ साली ‘ईएसपीएन’ वाहिनी सुरू झाल्यापासून हर्षा या वाहिनीवरील क्रिकेटचा चेहरा बनले. क्रिकेट जगतातील सर्व महत्त्वाच्या रेडिओ स्टेशन्सवर त्यांचा आवाज गाजला. १९९१-९२ साली ते सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात गेलेला असताना त्याचा आवाज ‘सेक्सिएस्ट व्हॉईस ऑन रेडिओ’ ठरवण्यात आला.

लेखकाची पुस्तकं

आऊट ऑफ द बॉक्स

क्रिकेट: भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं


हर्षा भोगले
अनुवाद : चंद्रशेखर कुलकर्णी


स्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्‍या काही वाचकांना या पुस्तकातून निश्‍चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा अंगी बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील.
— सचिन तेंडुलकर
टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंण्ट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेर्‍याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे.
— शेखर गुप्ता
खेळाबाबत प्रेम आणि ज्ञान यांच्या अपूर्व संगमाचे स्पष्ट प्रतिबिंब हर्षाच्या शैलीदार लिखाणात दिसते.


195.00 Add to cart