शिखरावरून
अनुवाद :
श्रीकांत लागू यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३५ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी रुपारेल महाविद्यालय, मुंबई येथून १९५९ साली बी.ए.(अर्थशास्त्र) ही पदवी प्राप्त केली आहे. व्यवसायाने ते ‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीचे संचालक होते.
मोबाईलचा शोध लागण्याच्या आधीपासून ‘माणसं जोडणं’ हे त्यांचं व्यसन होतं. कोणतीही गोष्ट पाहिली, वाचली किंवा भावली तर त्यात मित्रमंडळींना सहभागी करून आनंद वाटणं ही त्यांची वृत्ती होती. सागरसफरीत आनंद लुटणारं, आकाश निरीक्षणात गुंगून जाणारं व धरतीवरील गिरीशिखरं पादाक्रांत करण्याचा रोमहर्षक अनुभव घेणारं श्रीकांत लागू हे एक हा दिलदार–दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी रंगायन, अविष्कार व रुपवेध या संस्थांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘तुघलक’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या तसंच नभोवाणीवरील अनेक श्रुतिकांमध्येही त्यांचा सहभाग होता. विविध पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. त्यांच्या लेखांचे संग्रही प्रकाशित झाले.
2013 साली त्यांचं निधन झालं आणि मराठीतला एक कलंदर, हरहुन्नरी लेखक हरपला.
शिखरावरून..
एडमंड हिलरी म्हणजे शेर्पा तेनसिंगसह उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणारे साहसवीर !
‘एव्हरेस्ट’ व्यतिरिक्त त्यांनी
■ स्नो – कॅट ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण
■ उत्तर ध्रुवावर रोमहर्षक मोहीम
■ जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीचा भाग काढत तिच्या उगमापर्यंत जाण्याचा अचाट उपक्रम…
अशी मानवाला अशक्यप्राय वाटणारी अनेक साहस – शिखरे गाठली. व्यक्तिगत जीवनातही दुःखाचे डोंगर पेलणाऱ्या मृदु – निर्मळ हिलरी यांनी मानवतेचा ओलावा जीवनभर जोपासला. भारताशी अतूट नातं जोडणाऱ्या न्युझिलंडवासी हिलरींनी हिमालयातील लोकांसाठी जे कल्याणकारी कार्य हाती घेतले, ते आजतागायत सुरू आहे. भारतप्रेमी हिलरींनी भारतात ‘हायकमिशनर’चे पदही भूषविले. त्यांच्या साहसी उपक्रमांची माहिती देणारी, त्यांचे रोमहर्षक अनुभव कथन करणारी आणि त्यांचे सार्थ व्यक्तिगत जीवन उलगडणारी ही त्यांची ‘आत्मगाथा’ शिखरावरून !