आपल्यासाठी आपणच
उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी
डॉ. रोहिणी पटवर्धन
वय वाढणं म्हणजे नक्की काय असतं? तर वयाबरोबर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होणं. या बदलांमुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. साठीनंतरच्या या टप्प्यात अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्याही जाणवू लागतात आणि त्यावर समंजस भूमिका घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं अशी एक गरज वाटू लागते.
आज आपली दैनंदिन जीवनशैली अमूलाग्र बदलली आहे. त्याचबरोबर आयुष्यमानही वाढलं आहे. वाढलेल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं याचा विचारही ज्येष्ठांनी केलेला नसतो. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात.
या दृष्टीने या पुस्तकात ज्येष्ठांचे प्रश्न निर्माण होण्यामागची कारणं कोणती? वृध्दांच्या समस्यांवर काम करणार्या संस्था नक्की काय करतात? अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. याशिवाय ‘वृध्दकल्याणशास्त्र’ या नवीन विद्याशाखेची ओळख करून दिली आहे. तसेच वृध्दनिवासाचे विविध पर्याय, वृध्दाश्रमांचे प्रकार व तेथील सोयी-सुविधांची माहितीही यात आहे.
वृध्दांच्या समस्या वृध्दांनीच सोडवाव्यात, त्यासाठी त्यांनी मानसिकता बदलावी व वृध्दकल्याणासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजेच ‘आपल्यासाठी आपणच’ हा सर्वस्वी नवा विचार व सकारात्मक दृष्टिकोन या पुस्तकात लेखिकेने मांडला आहे.