डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले या १९९०च्या दहावी व १९९२च्या बारावी परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम आल्या आहेत. त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. हॉस्पिटल इथून एम.बी.बी.एस. आणि एम.एस. जनरल सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी मुंबईतील बाई जेरबाई चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, या प्रख्यात हॉस्पिटलमधून एम.सी.एच.पेडियाट्रिक सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे इथे १३ वर्षं बालशस्त्रक्रियातज्ज्ञ म्हणून काम केलं असून मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये सहयोगी प्राध्यापक व पेडियाट्रिक सर्जरी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
त्या बाललैंगिक अत्याचारावर पॉक्सो कायद्याअंतर्गत पालक-शिक्षकांसाठी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करतात. शिवाय सदर विषयावर जनजागृतीसाठी मराठी व इंग्रजीमधून पुस्तिकांचं लेखन करतात. अत्याचारग्रस्त बालकांवर प्रत्यक्ष उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना अनुभव असून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांच्या उपचारासाठी तज्ज्ञ भारतीय डॉक्टरांच्या पथकामध्ये त्यांचा समावेश असतो.

लेखकाची पुस्तकं

जपूयात निरागस बालपण

बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय


डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले


आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या लहानग्याचं बालपण जपणं खरोखर एक आव्हान झालं आहे. वाढता चंगळवाद, बदललेली जीवनशैली, परिसीमा गाठणाऱ्या मनोविकृती यांमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक भीतीदायक केसेस शहरी आणि ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत.
ससून हॉस्पिटलमध्ये बालशल्यविशारद म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी भोसले यांनी बाललैंगिक शोषणाच्या अनेक गंभीर केसेस हाताळल्या आहेत. मुलांवरील अत्याचारांचं वाढतं प्रमाण पाहून अशा दुर्घटना रोखण्याची गरज या संवेदनशील डॉक्टरला वाटली. शरीरावरच्या जखमा बऱ्या करता करता समुपदेशनाद्वारे, पुस्तिकेद्वारे, प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे डॉ. मीनाक्षी आज हा गंभीर प्रश्न घेऊन पालकांपर्यंत, एकंदर समाजापर्यंत पोहोचू पाहत आहेत. हे पुस्तकही या उपक्रमाचा भाग आहे. पुस्तकातील चार विभागांतून या प्रश्नाची पूर्ण व्याप्ती दिसून येईल…
1. अत्याचाराचे प्रकार
2. काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी
3. अत्याचार होऊ नयेत म्हणून.. आणि
4. अत्याचाराची घटना घडल्यानंतर…
आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगणारं… जपूयात निरागस बालपण



125.00 Add to cart