डॉ. छाया महाजन

डॉ. छाया महाजन कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार, ललितगद्य व बालवाङ्मय लेखिका, कवयित्री, अनुवादक, व्याख्याती, अभिवाचक व कोशकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्या इंग्रजी विषयात एम.ए., पीएच.डी. आहेत. शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. औरंगाबादमधील डॉ. इं.भा. पा. महिला कॉलेजच्या त्या प्राचार्य होत्या. इंग्रजीच्या प्रपाठक व विभागप्रमुख, एम.फिल. व पीएच.डी.च्या मार्गदर्शिका म्हणूनही त्या काम करत आहेत.

बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या 'मेंबर ऑफ लॉर्डस्' म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

साहित्य अकादमीच्या English Literary Dictionaryच्या मराठी विभागात त्यांनी संपादन साहाय्य केले आहे.

जालना येथे जानेवारी, २०१५ रोजी झालेल्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

त्यांनी हायकोर्ट, औरंगाबाद येथे लोकन्यायालयाच्या सदस्या म्हणून काम केले आहे.

अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या त्या सक्रिय पदाधिकारी आहेत आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

आजपर्यंत त्यांची एकूण ४२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या साहित्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मोबाईल : ९८२३२५५९०२
९४२३१८५९०३

लेखकाची पुस्तकं

माणसांच्या गोष्टी

 


डॉ. छाया महाजन


माणसांच्या गोष्टी

आपल्या अवतीभवती अनेक अनेक ढंगांची, अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसं वावरत असतात. आयुष्याच्या लढाईत आपापल्या परीने सामोरे जाणारे हे चेहेरे, काही हरून गेलेले, काही पिचलेले, काही उमदे, काही नियतीशी तडजोड करणारे, तर काही लढायला उभे ठाकलेले… असे विविध चेहेरे या कथासंग्रहात आपल्याला भेटत राहतात.

डॉ. छाया महाजन यांनी हे चेहरे विविध प्रसंगांतून, निवेदनातून आणि पात्रांमधून साकारले आहेत. रजनी, आसावरी, अमांडा, वसुधा, वच्छी अशा व्यक्तिरेखांमधून मानवी स्वभावाचे कंगोरे, त्याची जीवनावरची आसक्ती आणि नात्यांच्या गहियऱ्या छटा या कथासंग्रहात लेखिका सशक्तपणे रेखाटते.

मानवी नात्यांची वीण उलगडून दाखवणाऱ्या पंधरा कथा… माणसांच्या गोष्टी.


200.00 Add to cart