भा.ल. महाबळ

मराठी साहित्यात ज्येष्ठ विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भा.ल. महाबळ यांनी विपुल लेखन केलेलं आहे. वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात. मुंबईच्या माटुंगा परिसरातील 'व्हीजेटीआय’या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते वयाच्या ६०व्या वर्षी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. १९४९ ते १९५८ या काळात म्हणजे महाबळ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या आणि नंतर सांगलीच्याच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी विलिंग्डन कॉलेजातून मी बी.एस्‌सी (ऑनर्स) ही पदवी घेतली, दोन शाळांत शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर मिरजेच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग) ही पदवी मिळवली. विद्यार्थी असताना त्यांनी, अमृत, आलमगीर, किर्लोस्कर-स्त्री-मनोहर, तारका, रंजन, वाङ्मयशोभा, विविधवृत्त, सकाळ, संजय, सह्याद्री, स्वराज्य, हंस-मोहिनी-नवल, या नियतकालिकातून कथा, लेख, कविता लिहिल्या. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले असून इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

लेखकाची पुस्तकं

आजी-आजोबा : आधार की अडचण?


भा.ल. महाबळ


लेखक भा.ल.महाबळ यांनी अनेक प्रकारे विचारमंथन करून आपापल्या परीने मार्ग काढणारे काही आजी-आजोबा या पुस्तकात उभे केले आहेत. हे आजी-आजोबा अनेकविध कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान आणि संबंध यांचे नमुने दाखवतात. दोन्हीपक्षी कुठे काय चुकत असते तेही समोर ठेवतात.
प्रत्येकाने विचार करून, थोडे अंतर्मुख होऊन आपापले काटे-कंगोरे झिजवून घेतले, आपापल्या भूमिका समजून घेतल्या, दुसर्‍याच्या मन:स्थितीचा विचार केला तर कितीतरी संसार सुखा-समाधानाने एकमेकात गुंतून राहू शकतील.
प्रस्तुत पुस्तकातील लेख कुटुंबातील सर्व घटकांना विचार करायला प्रवृत्त करतील व घरात निकोप वातावरण निर्माण होण्यास सहाय्यभूत होतील अशी आशा आहे.


170.00 Add to cart

जेष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या

कुटुंबातील सामंजस्याकरता…


भा.ल. महाबळ


आज बदललेल्या जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाचं विभाजन होऊन विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं आहे. कोणाला वेळ द्यायला किंवा कोणाचा वेळ घ्यायलाही आपल्याकडे फुरसत नसते. तरीही, बरीच कुटुंबं अशी आहेत जी गुण्यागोविंदाने एकत्र राहाता आहेत, एकमेकांशी संवाद ठेवून आहेत. अशा एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांसाठी भा. ल. महाबळ काही बोलक्या व्यक्तिरेखांमधून व प्रसंगांतून नात्यात जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नकळत मार्गदर्शन करून जातात. घरात सशक्त व आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी घरातील सदस्य — विशेषत: ज्येष्ठ व्यक्ती विधायक व परिपक्व भूमिका बजावू शकतात. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केल्या व दुसऱ्याचा विचार केला तर कुटुंब कसं सुखी व समाधानी राहू शकतं हे लेखक विविध लेखांमधून पटवून देतात.

नुसतं वयाने ‘ज्येष्ठ’ न राहता वागण्यातून ‘ज्येष्ठ’ होण्यासाठी ज्येष्ठांसाठी चार गोष्टी युक्तीच्या….


140.00 Read more

हास्यझरे

भा.ल. महाबळ


खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.


30.00 Add to cart

हास्यतारे

भा.ल. महाबळ


खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.


30.00 Add to cart

हास्यपाठ


भा.ल. महाबळ


खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.


30.00 Add to cart

हास्यवारे


भा.ल. महाबळ


खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.


30.00 Add to cart