अरविंद गोखले

अरविंद व्यंकटेश गोखले यांनी ‘केसरी ते लोकसत्ता’ अशी सलग चार दशकांची पत्रकारिता केली आहे. त्यांनी केसरी आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी संपादक आणि लोकसत्ता या दैनिकाचे निवृत्त साहाय्यक संपादक ही पदं भूषवली आहेत. १९७९ साली लंडनच्या ‘कॉमनवेल्थ प्रेस युनियन’ची हॅरी ब्रिटन मेमोरिअल फेलोशिप मिळवून त्यांनी पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतलं. तसंच त्यांनी १९९८ साली वॉशिंग्टनच्या ‘द हेन्री स्टिम्सन सेंटर’ची फेलोशिप मिळवून भारत-पाकिस्तान संबंधांवर विशेष संशोधन केलं आहे. ‘पत्रकारिता अभ्यासक्रमा’चे ते मानद व्याख्याते आहेत.
याच संशोधन काळात त्यांनी लष्करप्रमुखपदी जनरल परवेझ मुशर्रफ यांची नियुक्ती होणार असल्याची बातमी ‘केसरी’त सर्वप्रथम प्रसिद्ध केली. आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषत: भारत-पाकिस्तान संबंध हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी पाकिस्तानचा पाच वेळा दौरा केला आहे. तसंच अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन, यांसह पंधरा देशांचे अभ्यासदौरे केले आहेत. त्यांनी केसरीत १९७०पासून सलग आठ वर्षं ‘पाकिस्तानचे वार्तापत्र' हे साप्ताहिक सदर चालवलं. लोकसत्ता दैनिकात ‘दक्षिणायन’ हे सदर, तर ‘पाकिस्ताननामा’ आणि ‘अफपाकनामा’ ही दोन सदरं दिव्य मराठीत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या नावे अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत.

लेखकाची पुस्तकं

असाही पाकिस्तान


अरविंद गोखले


साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान…

पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली.

पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा – असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात्‌ ‘असाही पाकिस्तान!’

– कुमार केतकर यांच्या प्रस्तावनेतून


240.00 Read more