आनंद करंदीकर

B.Tech ( Mumbai ) , M.B.A. ( I.I.M. Calcutta ) , Ph.D. ( Pune )

मुंबईत ५ वर्षे नोकरी ( Tata Economic Consultancy , Mukand Iron )

युक्रांदमधे सहभाग , दोन वर्षे उदगीरमधे पूर्णवेळ काम अभ्यासाचा मुख्य विषय : शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान कसे पोहचवावे ?

स्त्रीमुक्ती चळवळ , लोकविज्ञान चळवळ यात सहभाग बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्याबरोबर

सत्याग्रहात सहभाग , प्रत्येक वेळी १५ दिवसांचा कारावास .

Marketing and Econometric Consultancy Services ( METRIC ) या भारतातील सर्वात मोठ्या आणि २ ९ देशात कारभार असलेल्या व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रवर्तक आणि २५ वर्षे अध्यक्ष

Distinguished Professor , INDSEARCH , Savitribai Phule Pune University .

• विविध विषयांवर वैचारिक लेखन.

• सध्या ' विचारवेध ' व्यासपीठाचे समन्वयक म्हणून कार्यरत

लेखकाची पुस्तकं

माझ्या धडपडीचा कार्यनामा

उद्योग, व्यवस्थापन… लेखन, समाजकार्य… एक उद्बोधक मुशाफिरी!


[taxonomy_list name=”product_author” include=”3805″]


माझ्या धडपडींचा कार्यनामा ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ – सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना, एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता…. तर करियर घडवताना, लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता… अनेक प्रयोग करत खऱ्या अर्थाने कार्यरत होता. मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर..
‘इंडसर्च’ या प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे . ‘मेट्रिक कन्सल्टन्सी लि.’  ही भारतातील अव्वल दर्जाची मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी फर्म त्यांनी दूरदृष्टी ठेवून उभारली. या कंपनीच्या माध्यमातून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कामाच्या आघाडीवर ‘युक्रांद’ , ‘जनवादी महिला संघटना’ , ‘लोकविज्ञान संघटना’ अशा संघटनांसोबत अनेक संघर्षात्मक आणि विधायक कामं त्यांनी केली. या पुस्तकात त्यांनी आपल्या अशाच अनेक धडपडींना स्वतःच्या खास शैलीत शब्दबद्ध केलं आहे. हे सर्व कार्यानुभव वाचतांना जाणवते ती त्यांची काम करण्याची तळमळ, कामाकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन, कमालीची कल्पकता आणि अचंबित करणारा उत्साह !
एका प्रसिद्ध कवीचा मुलगा ही ओळख मागे टाकत दोन टोकांवरच्या प्रवासातील उड्या घेत केलेल्या आनंदी धडपडीचा हा प्रामाणिक लेखाजोखा … अर्थात माझ्या धडपडीचा कार्यनामा !

 

Original price was: ₹395.00.Current price is: ₹340.00. Add to cart

रोजगार निर्मितीच्या दिशा

बेरोजगारीचा भस्मासूर गाडण्यासाठी ठोस उपाययोजना


आनंद करंदीकर


दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी रोजगार कमी होत गेल्यास आर्थिक विषमता ही आज देशापुढची एक गंभीर समस्या …. वाढीला लागणार आणि आर्थिक विषमता वाढली की सामाजिक प्रश्नही निर्माण होणार , यावर उपाययोजना करून रोजगारनिर्मिती वाढीस कशी लागेल याचा ऊहापोह या पुस्तकात आनंद करंदीकर अभ्यासपूर्णरित्या करतात.

बेरोजगारीची आर्थिक सामाजिक – राजकीय कारणं , बेरोजगारीचे दुष्परिणाम याचं सरधोपट विश्लेषण न करता , अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा आधार घेत करंदीकर विषयाची मांडणी करतात . सोप्या भाषेत कधी कवितांचा आधार घेत ते वस्तुस्थितीचं आकलन करतात . शिक्षण , आरोग्य , शेती , बांधकाम , हरित उद्योग , हस्तव्यवसाय , छोटे उद्योग अशा विविध क्षेत्रांत तब्बल ३ कोटी ६० लाख रोजगारनिर्मिती होण्यास देशात वाव आहे , हे ते साधार पटवून देतात . संख्याशास्त्रीय पध्दतीने आखणी केल्यास रोजगारनिर्मितीचं उद्दीष्ट आपण गाठू शकतो याचा ते विश्वास देतात . विविध तक्ते , आलेख यांच्या साहाय्याने ते विषयाची उकल सोप्या रितीने करतात.

हे पुस्तक एम.पी.एस.सी. , यू.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनाही अतिशय उपयोगी ठरणार आहे.

सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या एका ज्वलंत समस्येची गंभीरपणे दखल घेत , त्यावर शास्त्रीय पध्दतीने उपाययोजना सांगणारं पुस्तक …

रोजगार निर्मितीची दिशा

375.00 Add to cart