अक्षय मनवानी

लेखक अक्षय मनवानी हे पूर्वी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते . परंतु, त्यात फारसे समाधानी नसलेले मनवानी नंतर मुक्त लेखनाकडे वळले. त्यांनी भारतीय सिनेमा आणि सांस्कृतिक क्षेत्रावर विपुल लेखन केलं आणि ते 'द कॅराव्हान' , 'बिझनेस स्टैंडर्ड' , 'मॅन्स वर्ल्ड' आणि ‘मुंबई मिरर' आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या कार्यामुळे दंतकथा बनलेले असूनही ज्यांच्या कार्याचा फारसा गौरव झालेला नाही, अशा अनेकांच्या कार्याचं दस्तऐवजीकरण करून त्यांच्या वारशाचं जतन करण्यासाठी बरंच काही करणं आवश्यक आहे, असं लेखक मनवानी यांना मन:पूर्वक वाटतं. साहिर लुधियानवी यांचं जीवन आणि कार्य याबाबत संशोधन करून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे त्याच दृष्टीने केलेला प्रयत्न आहे.

लेखकाची पुस्तकं

लोककवी साहिर लुधियानवी

जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा


अक्षय मनवानी
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’, यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा… लोककवी साहिर लुधियानवी


400.00 Add to cart