अभिजित पेंढारकर
मनोरंजन माध्यमांसाठी लेखन करणाऱ्या अभिजित पेंढारकर यांनी आत्तापर्यंत विविध प्रकारचं लेखन केलं आहे. आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये पत्रकारिता केल्यानंतर आता ते स्वतंत्रपणे लेखन क्षेत्रात काम करत आहेत. 'किशोर', 'मनशक्ती' अशा मुलांच्या मासिकांबरोबरच अनेक दिवाळी अंकांमध्येही त्यांच्या कथा, लेख प्रसिद्ध झाले आहेत. 'वाकड्यात शिरलेल्या कथा' हे त्यांचं विनोदी कथांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. काही पुस्तकांचं इंग्रजीतून मराठीत अनुवाद आणि काहींचं शब्दांकनही त्यांनी केलं आहे. ऑडिओ अॅप्स, टीव्ही आणि रेडिओसारख्या माध्यमांसाठीही त्यांनी अनेक प्रकारची स्क्रिप्ट्स लिहिली आहेत. मुलांसाठी ते सातत्यानं लेखन करत आहेत.







