भूमिका (डिलक्स आवृत्ती)

300.00


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.
केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल.
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक… भूमिका


Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.