इत्रनामा
₹350.00
हिनाकौसर खान
ही गोष्ट ऐन पंचविशीतल्या नाझियाची. तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लीम असण्याची, तिच्या सामाजिक जाणिवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही !
जगण्याविषयीच्या कल्पना मनात स्पष्ट असणाऱ्या नाझियाला सुमीत भेटतो. समंजस, शहाणा आणि थोडासा कन्फ्युज्डही ! दोघंही एकमेकांत गुंतत जातात. भलेही अलीकडचे काही तरुण धर्म-जात मानत नसतील, मात्र नकळत्या वयात झालेल्या संस्कारांची सोबत तर प्रत्येकाबरोबर असतेच. प्रेमात सबकुछ करायला तयार असणारी मंडळी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र गोंधळून जातात, अशावेळी उमगलेली आस्था आणि न उमगलेली आस्था यांच्यातलं घर्षण अटळ होऊन जातं. या सगळ्या व्यवहार-संघर्षातून नाझिया आणि सुमीतही सुटलेले नाहीत.
लहानपणापासूनचा नाझियाचा घट्ट मित्र असद हा तिच्याच धर्मातला… तिच्या विचारांचा, तिच्या स्वप्नांचा आदर करणारा आणि तिच्यावर बेहद प्यार करणाराही… पण प्रेम असं सोयीने करता येतं का? अनेक पेच, अनेक प्रश्न…
प्रेम, मैत्री, आस्था, आस्तिकता आणि मानसिक
आंदोलनाच्या विवरात अडकलेल्या या तिघांची
धर्मापलीकडे जाणारी कादंबरी…
Reviews
There are no reviews yet.