विन्सेंट, वाइन आणि मोक्ष
Sale₹230.00 ₹270.00
लेखक : देवेंद्र भागवत , दीप्ती देवेंद्र
थांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली…
विन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग…
आसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास… विन्सेंट, वाइन आणि मोक्ष
ही कादंबरी आहे अमन आणि निशा या प्रेमी जीवांची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या वेदनेची !
दोन अस्सल कलाकार माणसांच्या अस्सल कलेचा आणि अस्सल प्रेमाचा हा ओहोळ आहे. मला कायम वाटत आलंय की, वेदनेने माणसाला कितीही छिन्नविच्छिन्न करून टाकलं तरी एका बिंदूला ती वेदना संपत जाते. मात्र त्या वेदनेतून जी कलानिर्मिती होते ती कायमसाठी टिकून राहते आणि अनेकांना इन्स्पायर करत राहते.
माती, पाणी, उजेड, वारा, अंधार, अग्नी, आकाश… साऱ्यांचा मेळ उतरला की उत्तम चित्रपट हाती येतो. तसंच या कादंबरीचं झालंय…!
गजेंद्र अहिरे (चित्रपट दिग्दर्शक)
Reviews
There are no reviews yet.