शोध

80.00

पत्रकार, सर्जनशील लेखिका, बालसाहित्याच्या आंतरराष्ट्रीय संशोधक अभ्यासिका व भाषाविषयक चळवळीच्या प्रणेत्या म्हणून स्वाती राजे यांची ख्याती आहे. त्यांनी सकाळ दैनिकात १४ वर्षं पत्रकारिता केली असून विविध दिवाळी अंकांमधून कथा, बालसाहित्य, लेख असं लेखन केलं आहे. तसंच लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांचं संवादलेखनही केलं आहे. तसंच मुलांमध्ये भाषेची गोडी वाढावी व त्यांना वाचनाचं महत्त्व समजावं यासाठी त्यांनी 'भाषा फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली असून त्यांअतर्गत त्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. बालसाहित्याच्या अभ्यासिका या नात्याने त्यांनी चीन, दक्षिण आफ्रिका, स्पेन, इंग्लंड, इंडोनेशिया, थायलंड, स्वीडन, डेन्मार्क, मेक्सिको आदी देशांत विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत व चर्चासत्रांत आपले शोधनिबंध सादर केले आहेत. बालसाहित्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपल' (इबी) या संस्थेच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. त्यांची आठ बालकथांची पुस्तकं प्रकाशित असून त्या पुस्तकांचे इंग्रजी तसंच कोकणी भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या लेखनाला व कार्याला विविध राज्य शासनाबरोबरच राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.

चिमुकल्या धुळीच्या कणाला येत होता

आकाशातल्या सूर्याचा भारी राग!

या सूर्याची खोड मोडण्यासाठी

त्याने सुरू केला एक गमतीदार शोध!

तर ही गोष्ट,

‘धुळकोबा’ने सुरू केलेल्या

शोधाशोधीची आणि शेवटी त्याला

लागलेल्या एका वेगळ्याच शोधाची!

चला शोधू या; धुळकोबाला कसला शोध लागतो ते!



Add to wishlist
Share
Share
ISBN:978-93-86493-77-4
Binding Type:Paper Back
Pages :16

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.