हरी – हर युद्ध
₹295.00
श्री कृष्ण आणि शिवशंकर यांच्यातील महासंग्रामाची कथा
लेखक : अंतर आत्रेया
अनुवाद : प्रणव सखदेव
आर्यावर्त साम्राज्याचा हेर संजन गिरोह या बंडखोर संघटनेत गुपचूप प्रवेश करतो. तिथे त्याची मेट होते, धाडर्स मधूरी. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. जेव्हा ते आपापली रहस्यं एकमेकांना सांगतात, तेव्हा समजतं की, संजम हा प्रत्यक्षात द्वारकाधीश श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आहे, तर मधू ही प्रत्यक्षात प्राग्ज्योतिषपूर राज्याचा असुर राजा बाणासुराची कन्या उषा आहे. आर्यावर्त साम्राज्य खिळखिळं करण्यासाठी बाणासुराने गिरोहला पाठिंबा दिला, असा आरोप श्रीकृष्णाने केलेला असतो. त्याबद्दलचं सत्य जाणून घेण्यासाठी उषा आणि अनिरुद्ध प्राग्ज्योतिषपूरची राजधानी सोनितपूरला जातात.
परंतु तिथे अनिरुद्धला कैद होते आणि युद्धाचे बिगूल वाजतात हे युद्ध असनं दोन देवांमधलं… श्रीकृष्ण आणि शिवशंकर यांच्यातलं… बाणासुराला दिलेल्या वरदानामुळे शिवशंकराला युद्धात भाग घ्यावा लागतो, तर नातवंडासाठी, त्याच्यावरील प्रेमापोटी, आपल्या कुटुंबासाठी श्रीकृष्णाला युद्ध करणं अनिवार्य असतं… आणि मग अख्खी सृष्टीच नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोचते….
भारतीय पुराणकथांमधल्या एका रक्तपाती युद्धाची थरारक कथा… हरी-हर युद्ध !
















Reviews
There are no reviews yet.