चित्रांतून उलगडणारं रहस्य

Sale

250.00 295.00


लेखक : तरुण मेहर्षी

अनुवाद : विजय तरवडे


वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कमल यांना कृषी संशोधन केंद्रातील दोन चित्रं चोरीला गेल्याचं आणि त्या चित्रांची किंमत ४०० कोटी रुपये असल्याचं समजतं… आणि त्याच वेळी भारतीय गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांना ‘आयएसआय’मध्ये पेरलेल्या एका हेराकडून माहिती मिळते की, एका दहशतवादी गटाकडून मोठा आण्विक हल्ला करण्याची योजना आखली जाते आहे.

एकीकडे कमल चोरीचा माग काढू लागतात… तर दुसरीकडे गुप्तचर संस्था प्रमुखांना समजतं की, त्या चित्रांच्या विक्रीतून उभा राहणारा निधी आण्विक हल्ल्याकरता वापरला जाणार आहे! त्यात भर म्हणजे या प्रकरणात अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’देखील गुंतलेली असते…

कमलना ती चित्रं परत मिळवता येतात का?

भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना चित्रांचा लिलाव थांबवता येतो का?
अखेरीस, त्यांना दहशतवादी हल्ला रोखता येतो का?

सत्य घटनांवर आधारलेलं, वेगवान आणि खिळवून ठेवणारं थ्रिलर… चित्रांतून उलगडणारं रहस्य


 

Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.