125.00

चंद्राची सावली

 

मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !


 

978-93-92374-24-1 Papar Back ,

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.