217 | 978-93-82591-02-3 | Bhoomika | भूमिका | Yashwantrao Chavan | यशवंतराव चव्हाण | यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल. केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक… भूमिका |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 247 | 21.6 | 14 | 1.2 | 260 |
This book is a compilation of selected speeches, some essays and interviews given to reknowned newspapers and magazines when Shri. Yashwantrao Chavan was a cabinet minister from 1965 to 1979.
Through this book the reader gets to know his views about the political, social and econimic issues in our society. |
Political | राजकीय | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | 250 | Bhumika.jpg | Bhumika_BackBC.jpg |
कारेनामा
[taxonomy_list name=”product_author” include=”1728″]
औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.
Reviews
There are no reviews yet.