आशिष कर्वे हत्या प्रकरण
Sale₹295.00 ₹340.00
इन्स्पेक्टर सारळकर केस फाइल्स
लेखक : सलील देसाई
अनुवाद : शुचिता नांदापूरकर-फडके
आशिष कर्वे यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये मुसाइड नोटसह मापडतो, तेव्हा पीएसआय मोटकर यांना ती केस आत्महत्येची आहे असंच वाटतं. परंतु नेहमीप्रमाणेच त्यांच्या साहेबांची सीनिअर इन्स्पेक्टर सारळकरांची कल्पनाशक्ती वेगळेच तर्कवितर्क लढवू लागते.
जसजसा ते तपास करू लागतात, तसतसे वेगवेगळे तपशील, तथ्यं समोर येऊ लागतात. आशिष यांचा व्यावसायिक भागीदार आणि त्यांचे संबंध ताणलेले असतात, तर बायको, मित्र, मेव्हणा यांना आशिष नकोसे झालेले असतात आणि सख्ख्या भावाशी त्यांचे मालमत्तेवरून हाणामारी करण्यापर्यंत टोकाचे वाद झालेले असतात…
पोस्टमॉर्टम अहवालानुसार आत्महत्या नसून तो खून आहे हे सत्य उघड होताच, सारळकरांची विचारशक्ती आणखी वेगाने दौडू लागते. ते तप करून एकेक धागा सोडवू लागतात, तेव्हाच आणखी एक खून होतो ! आणि त्यापाठोपाठ बाहेर येतात अनेक काळी, गडदगहिरी सत्यं…
सत्य, अर्धसत्य आणि असत्य यांच्या गुंत्यातून मानवी व्यवहारांच्या अंधाऱ्या बाजू उलगडणारी, उत्कंठावर्धक मर्डर मिस्टरी… आशिष कर्वे हत्या प्रकरण !
















Reviews
There are no reviews yet.