उद्योग करावा ऐसा (डिलक्स आवृत्ती)
₹300.00
२१ उद्योजकांशी साधलेल्या संवादातून उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स
प्रथितयश उद्योजक आणि प्रेरणादायी बिझनेस लिडर म्हणून सुरेश हावरे परिचित आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.एससी.टेक. ही पदवी संपादित केली. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्यूत्तर शिक्षणही पूर्ण केलं. शिवाय त्यांनी इतिहास या विषयात एम.ए. केलं असून नुकतेच त्यांना ‘अॅफोर्डेबल नॅनो हाऊसिंग' या विषयासाठी मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. (डॉक्टरेट) या पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे.
नागपूर विद्यापीठाचे ते मेरिट स्कॉलर व इंजिनिअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेत. डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी २७ वर्षं वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून सेवा केली आहे. न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ३७ शोधनिबंध नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्हिएन्ना येथील IAEA या अणुशास्त्रातील सर्वोच्च संस्थेत भारतीय शास्त्रज्ञांच्या टीमचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. याशिवाय गेली २५ वर्षं ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. सध्या ते सुप्रसिद्ध ‘हावरे ग्रुप ऑफ कंपनीज्’चे नेतृत्व करत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान असून त्यांना अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायिक पुरस्कारही मिळालेले आहेत. जे.एन.पी.टी.चे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे आणि सध्या ते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष आहेत. नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री’ दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे.
‘उद्योग तुमचा, पैसा दुसर्याचा’ या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक ‘पुस्तक-मंत्र’ घेऊन येत आहेत.
हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर झालेल्या ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’चं संपादित स्वरूप. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता. या ‘शो’मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणार्या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या. तब्बल 72 लाख लोकांनी हा ‘शो’ बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरू केले.
हावरे हे स्वत: अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या. या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले ‘मॅनेजमेंट थॉटस्’ हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात.
ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या ‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.
नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक… उद्योग करावा ऐसा !
Reviews
There are no reviews yet.