किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच
ए.पी.जे. अब्दुल कलाम अनुवाद : प्रणव सखदेव
डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…
२७ जुलै २०१५… याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच!
कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते.
या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत…उज्ज्वल भारत !