आनंदस्वर ज्येष्ठांसाठी

चैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन


डॉ. रोहिणी पटवर्धन


आयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे… जबाबदाऱ्या, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं… प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत किंवा जवळ असूनही नसल्यासारखीच…
मग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी!
ज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. ही ‘सेकंड इनिंग’ सकारात्मकरित्या जगून अर्थपूर्ण कशी करता येईल याबद्दल अत्यंत सहज-सोप्या पद्धतीने
मार्गदर्शन यात मिळतं.
उतारवयातल्या विविध आजारांविषयीची थोडक्यात माहिती, वृद्धकल्याणशास्त्र या अभ्यासाच्या नव्या शाखेचा परिचय, इच्छापत्र व मृत्यूपत्राबद्दलचे समज-गैरसमज, वृद्धाश्रमांची माहिती अशा अनेक कळीच्या विषयांवर लेखिका छोट्या सुटसुटीत लेखांमधून संवाद साधते.
आजकाल आयुर्मान वाढतं आहे आणि त्याला जोडून येणारे मानसिक, शारीरिक क्लेशही वाढत आहेत… मात्र यावर मात करून आयुष्याची ही ‘सेकंड इनिंग’ समृद्ध करता येते… ती कशी करावी याचा तालबद्ध मंत्र देणारं पुस्तक…आनंदस्वर ज्येष्ठांसाठी!


125.00 Add to cart

स्मार्टपणे व्हा कॅशलेस

आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


प्रणव सखदेव


देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या?
* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे?
* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची?
* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !



125.00 Add to cart

अष्टपैलू स्मार्टफोन

आपल्या अँड्रॉइड मोबाइलमधील सर्व सोयी-सुविधा व अ‍ॅप्स आत्मविश्वासाने वापरण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


सुश्रुत कुलकर्णी


श्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते.
पण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले! ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने! या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :

– बॉक्समधून आलेला नवाकोरा स्मार्टफोन कसा जोडायचा?
– कॉन्टॅक्ट्स सेव्ह कसे करायचे, त्यांचे ग्रुप कसे करायचे?
– एसएमएस, ग्रुप एसएसएस कसे करायचे?
– कार्यक्रमाला जाताना फोन ‘सायलेंट’ कसा करायचा?
– वाय-फाय स्मार्टफोनला कसे जोडून घ्यायचे?
– ईमेल कसा करायचा? त्याला फाइल कशी जोडायची?
– फोटो किंवा व्हिडिओ कसा काढायचा, तो शेअर कसा करायचा?
– वॉट्सअ‍ॅप, फेसबुक इ. अ‍ॅप्स कशी वापरायची?
– वॉलपेपर, थीम्स कशा बदलायच्या?
– आणि अर्थात, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं… आणि अनेक!

या पुस्तकातल्या छोट्या-छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्समुळे श्री. व सौ. देशमुख बिनधास्त स्मार्टफोनमधल्या उपलब्ध सोई-सुविधा वापरू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच तुम्हीही या अष्टपैलू स्मार्टफोनचं ‘बोट’ धरा, स्मार्ट व्हा!


125.00 Read more