ऑपरेशन ब्लू स्टार

एका थरारक कारवाईचं सत्यकथन खुद्द ऑपरेशन-प्रमुखाकडून…


ले. जन. के.एस. ब्रार
अनुवाद :भगवान दातार


ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त आणि बहुचर्चित लष्करी कारवायांपैकी एक होती असं म्हणता येईल. लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं. लष्कराच्या इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या अशा या थरारक कारवाईचं स्वत: ब्रार यांनीच केलेलं हे अतिशय अचूक आणि तपशीलवार वृत्तांत-कथन! यात कुठलेही तपशील वगळले नाहीत की कोणतीही अतिशयोक्ती नाही.
लष्करी तुकडयांना काहीवेळा अनपेक्षितपणे घ्यावी लागलेली माघार, अधिकाऱ्यांचे चुकलेले अंदाज, अतिरेक्यांचा चिवटपणा आणि निर्धार अशा सगळयाच तपशीलांचं यात सत्यकथन आहे. कारवाईबाबतच्या व्यूहरचनांचे नकाशे, छायाचित्रं आणि दिलेली अचूक आकडेवारी यामुळे या कथनाला एक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग आणि मोहिमेतले चढ-उतार यांचं यथार्थ वर्णन या पुस्तकात वाचायला मिळेल.
केवळ शिखांच्याच नव्हे, तर सर्वच भारतीयांच्या मनात खदखदत असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत हे पुस्तक अनेक अफवा, गैरसमज आणि असत्य गोष्टींचं निराकरण करतं.
या कारवाईच्या प्रत्येक टप्प्यावरील नियोजनात आणि प्रत्यक्ष कारवाईत ब्रार सहभागी होते. त्यांच्याच शब्दातली ही कहाणी…पूर्णपणे सत्य, अगदी जशी घडली तशी…’ऑपरेशन ब्लू स्टार’!



270.00 Add to cart

मोसाद मिशन्स

आशिष काळकर


काटेकोर नियोजन, चतुर, चौकस व देशाशी एकनिष्ठ असलेली हेरयंत्रणा आणि धूर्त, चलाख नेतृत्व यांच्या जोरावर ‘मोसाद’ने तिच्या निर्मितीपासून अशक्य वाटणाऱ्या अनेक मोहिमा तडीस नेल्या. या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आशिष काळकर यांनी मोसादच्या अशा काही निवडक नाट्यमय मोहिमांचं अथपासून इतिपर्यंत विस्तृत गोष्टीरूप कथन केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मोसादच्या यशस्वी मोहिमांबरोबरच, अयशस्वी मोहिमांचाही आढावा घेतला आहे. याशिवाय इस्त्रायल देशाची स्थापना, मोसादची निर्मिती, तिची गरज अशी पार्श्वभूमीही सांगितली आहे. त्यामुळे मोसादची यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेण्यास मदत होते. पुस्तकात शेवटी, काळकर यांनी इस्त्रायल-हमास संघर्षाचा इतिहास थोडक्यात सांगून २०२३च्या इस्त्रायल-हमास युद्धामध्ये मोसादने निभावलेली भूमिका विशद केली आहे जगातल्या भल्या भल्या देशांना धडकी भरवणाऱ्या आणि काही वाट्टेल ते झालं तरी हाती घेतलेलं काम पार पाडणाऱ्या एका गुप्तचर यंत्रणेच्या कहाण्या… मोसाद मिशन्स !

240.00 Add to cart

शिष्टाईचे इंद्रधनू

डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग


विजय नाईक


शिष्टाईचं अर्थात डिप्लोमसीचं विश्व म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनूच.
या विश्वाचे रंग, ढंग आणि विविध पैलू चार दशकांहून अधिक काळ दिल्लीत वास्तव्य असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत.
या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी किंवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाऱ्यांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे.
डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाऱ्या एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा कॅलिडोस्कोप म्हणजेच…शिष्टाईचे इंद्रधनू !


225.00 Read more

कस्तुरबा : शलाका तेजाची


[taxonomy_list name=”product_author” include=”346″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !



195.00 Add to cart

अजब खजिना निसर्गाचा

सलीम सरदार मुल्ला


गुड्डू आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना झाडं-फुलं-पानं-पक्षी-प्राणी असा सभोतालचा सगळा निसर्ग खूप आवडतो… पण ही पोरं काही फक्त निसर्गात रमणारी नाहीत बरं का! ती सायकलवरून रपेट मारत अभ्यास-सहलीला जातात… जखमी प्राण्यांची देखभाल करतात… ‘फुलपाखरू मंडळ’ स्थापन करून माहिती गोळा करतात… आणि हो, गावातल्या तळ्यातले मासे वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढाही देतात…!

निसर्गाची अद्भुत नवलाई जपण्यासाठी झटणाऱ्या निरागस, साहसी, बुद्धिमान आणि जागरूक मुलांची कुतूहल जागृत करणारी लाघवी गोष्ट…

150.00 Add to cart
1 2 3