सृजन पाल सिंग
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमधून सृजन पाल सिंग यांनी शिक्षण घेतलं असून त्यांना 'चतुरस्र विद्यार्थी' म्हणून सुवर्णपदक मिळालं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये पारदर्शक व्यवस्था उभारण्याच्या कामात ते 'बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप'सोबत काम करत आहेत. स्वित्झर्लंडमधील सेंट गॅलन सिम्पोसियम यांच्या 'ग्लोबल लीडर ऑफ टुमॉरो' या किताबासाठी त्यांचं नामांकन करण्यात आलं होतं . सृजन भारतातल्या ग्रामीण भागांत जाऊन तिथे कायमस्वरूपी विकासात्मक व्यवस्था तयार करता यावी, यासाठी विविध संस्थांसोबत काम करतात . महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रकाशित झाले असून ते सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रकल्पात काम करत आहेत.