राजीव तांबे

राजीव तांबे हे अनेक वर्षं सातत्याने केवळ मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यकार आहेत. 'बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल' त्यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार' 2016मध्ये मिळाला. देश आणि विदेशातील 23 भाषांतून 109 पुस्तके प्रकाशित. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी देश-विदेशात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या असून अभिनव शिक्षणपद्धतींवर त्यांचा विशेष भर असतो. त्यांनी 'युनिसेफ'साठी शिक्षण सल्लागार म्हणूनही काम केलं असून आजवर त्यांना अनेक मानसन्मान देऊन गौरवण्यात आलं आहे. मुलांशी बोलणं, त्यांना कथा-गोष्टी-गाणी म्हणून दाखवणं, संवाद साधणं या गोष्टी त्यांना विशेष प्रिय आहेत.