गीतांजली भोसले

गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .