डॉ. धनंजय केळकर
पुण्यातील ख्यातनाम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक म्हणून डॉ. धनंजय केळकर प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.एस. (जनरल सर्जरी) पूर्ण केलं. नंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई इथे कर्करोग शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं. त्यांना जपानमधल्या कुरुमे विद्यापीठातर्फे थोरॅसिक कर्करोगात संशोधनाकरता अभ्यासवृत्ती मिळाली होती. इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातून त्यांनी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेचं विशेष प्रशिक्षण घेतलं असून ते लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या हेड अँड नेक कॅन्सर विभागाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. सध्या ते वरिष्ठ ऑन्कोसर्जन म्हणून कार्यरत आहेत.