ए.पी.जे. अब्दुल कलाम

लेखकाची पुस्तकं

विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा

भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना केलेलं बहुमोल मार्गदर्शन


ए.पी.जे. अब्दुल कलाम
सहलेखक : सृजन पाल सिंग
अनुवाद : प्रणव सखदेव


भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार्‍या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान) यांसारख्या ‘आउट ऑफ द बॉक्स’ करिअर्सचा सहजसोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे.



250.00 Add to cart

कलाम संच

किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच


[taxonomy_list name=”product_author” include=”576″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या  विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…



595.00 Add to cart

माझा भारत… उज्ज्वल भारत

युवकांसाठी प्रेरणादायी भाषणं


ए.पी.जे. अब्दुल कलाम
सहलेखक : सृजन पाल सिंग
अनुवाद : प्रणव सखदेव


२७ जुलै २०१५… याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच!
कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्‍यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते.
या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत…उज्ज्वल भारत !



195.00 Add to cart

मिशन इंडिया

तरुणांसाठी विकसित भारत एक ध्येय


ए.पी.जे. अब्दुल कलाम
सहलेखक : वाय.एस. राजन
अनुवाद : प्रणव सखदेव


भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या
तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे.

तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया’चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं!
हे ध्येय साध्य करण्यासाठी कलाम यांनी विकसित देश म्हणजे काय, त्यांची लक्षणं, त्यांची अर्थव्यवस्था आणि भारताची सद्य:स्थिती यांबद्दल तपशीलवार विवेचन पुस्तकात केलं आहे. तसंच भारत विकसित देश व्हावा यासाठी आपण शेती, रसायन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजी, उत्पादननिर्मिती उद्योग, संरक्षण, सेवा क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी भविष्यात कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा सहजसोप्या शब्दांत उदाहरणासह यात ऊहापोह केला आहे.
भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं… सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक…मिशन इंडिया !



150.00 Add to cart