क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी
₹195.00
लेखक : श्रीकांत बोजेवार
लोकप्रिय होण्याकरता चार मित्र वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना पुरस्कार द्यायचा घाट घालतात. तेव्हा त्यांना कळतं पुरस्कार घेण्यापेक्षा पुरस्कार देणं हा एक मोठाच व्यवसाय आहे… गोपाळरावांची पत्नी राधा घर सोडून निघून जाते. तिला शोधताना गोपाळरावांची पुरती तारांबळ उडते. शेवटी ते नामी शक्कल लढवतात… पण तीच त्यांच्या अंगलट येते… क्ष सर्व क्षेत्रांतल्या कलावंत मंडळींना भेटतो. त्यांना कलेतून ‘मृत्यू’ या विषयावर अभिव्यक्त होण्याची गळ घालतो. कलावंत पेचात पडतात. ते ‘क्ष’ला भेटायला जातात तेव्हा तो अनंताच्या प्रवासाला निघालेला असत दैनंदिन जीवनातील घटना-प्रसंगांचं मुद्दल… नेमक्या, खुसखुशीत संवादांचा मसाला… आणि नर्मविनोद व ब्लॅक कॉमेडी यांची चरचरीत फोडणी… यांमधून साकारलेली तिखट-गोड, कडू आणि तुरट अशा सर्व चवींच्या ९ कथांची संग्रहरूपी रेसिपी… क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी !
















Reviews
There are no reviews yet.