गंगटोकमधील गडबड
₹95.00
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद :अशोक जैन
निसर्गरम्य गंगटोक इथे फेलूदा व तोपशे सुटी घालवायला आलेले असतात. तिथे एका कारखानदाराची गूढ हत्त्या होते, अगदी विलक्षण पद्धतीनं. संशय तर अनेकांवर असतो. मृत कारखानदाराचा भागीदार शशधर बोस, लांब केसाचा परदेशी हेल्मुट, रहस्यमय डॉ. वैद्य, एवढंच काय भित्रट सरकारवर देखील संशयाची सुई असते. अनेक गाठी, निरगाठी, कठीण मुद्दे आपल्या नेहमीच्या तेजस्वी कौशल्याने फेलूदा सोडवतो आणि गुन्हेगाराचा माग लावतो. वाचलेच पाहिजे असे हे रोमहर्षक रहस्य.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे दुसरे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.