कस्तुरबा : शलाका तेजाची
₹195.00
अरुण गांधी यांचा जन्म १९३४ साली दक्षिण आफ्रिकेत झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना भारतात त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्यासोबत राहण्यास पाठवण्यात आले. गांधीजींबरोबर ते तेव्हा अठरा महिने राहिले. अर्थातच त्या दरम्यान गांधीजींच्या अहिंसेच्या राष्ट्रीय मोहिमेचे ते साक्षीदार होते. नंतर १९५७ साली भारतात परतल्यानंतर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम पाहू लागले. आपली पत्नी सुनंदा हिच्या साथीने त्यांनी 'सेंटर फॉर सोशल युनिटी' या संस्थेची स्थापना केली. तसेच इ.स. १९९१मध्ये या उभयतांनी टेनेसी येथे ‘एम. के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉन व्हॉयलन्स' या संस्थेची स्थापना केली.
अनुवाद :
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले.
सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.
महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !
Author:अरुण गांधी, अशोक जैन
ISBN:978-81-86184-73-8
Binding Type:Paper Back
Pages :304
Categoriesचरित्र-आत्मचरित्र, पुरस्कारप्राप्त, राजकीय
Tagsअनुवादित, चरित्र, स्त्री विषयक
Reviews
There are no reviews yet.