द गोल
₹599.00
लेखक : एलियाहू एम. गोल्ड्रेट
अनुवाद : शुचिता नांदापूरकर-फडके
प्लांट-मॅनेजर अॅलेक्स रोगो एकदा सकाळी कारखान्यात पोचण्याआधीच त्याचा बॉस तिथे हजर असतो! ऑर्डर्स पूर्ण करायला उशीर होत असल्याने तो अॅलेक्सची चांगली खरडपट्टी काढतो आणि शेवटी ‘पुढच्या तीन महिन्यांत सुधारणा दिसली नाही तर हा प्लांट बंद करावा लागेल’ अशी धमकीवजा सावधतेची सूचना देऊन निघून जातो. आणि तिथून अॅलेक्सची व त्याच्या सहकाऱ्यांची सुधारणेकडे आणि यशाकडे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते… त्यात त्यांना मोलाची मदत करतो तो पारंपरिक विचारसरणीला दाहरे देणारा मार्गदर्शक जोनाह…
‘उद्योग-जगताले गुरू’ आणि मॅनेजमेंट क्षेत्रातले ‘जिनीयस’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या एलियाहू गोल्ड्रेट यांनी या पुस्तकामध्ये अॅलेक्सची कथा सांगता सांगता उद्योग जगतातल्या मॅनेजर्सना मौलिक संदेश दिले आहेत. त्यांनी विकसित केलेली ‘थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स’) TOC (या पुस्तकातून गोष्टीरूपात, दाखले देत विशद केली आहे.
खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर कादंबरीप्रमाणे लिहिलेलं आणि आपल्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारं उपयुक्त पुस्तक… द गोल !
Reviews
There are no reviews yet.