978-93-92374-49-4 | Samarthancha Vijay | समर्थांचा विजय | Narayan Dharap | नारायण धारप | समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप
समर्थ मालिका समर्थ कथा नव्या स्वरुपात ! |
paper back | Book | Rohan Prakashan | मराठी | 432 | 21.5 | 13.3 | 2.3 | Fiction | कथासंग्रह | 600 |
द बॅचलर ऑफ आर्ट्स
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
‘प्रेम’ या भावनेचा खर्या अर्थाने विचार करायला लावणारी ही कथा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारा चंद्रन या कथेचा नायक. आर.के. नारायण यांनी प्रेमात आकंठ बुडालेला चंद्रन आणि प्रेमभंगानंतरचा भरकटत जाणारा चंद्रन हा विरोधाभास खूपच सुंदर रेखाटला आहे. ‘प्रेम म्हणजे काय?’ याचा साक्षात्कार करून देणार्या अनेक घटना व प्रसंग या कादंबरीत वाचायला मिळतील. अल्लड व स्वच्छंदी आयुष्य जगणारा हा नायक ‘प्रेम’ या मृगजळामागे धावतो, ती गोष्ट मिळत नाही तेव्हा विरक्त, संन्यासीही होतो. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे जिवंत व्यक्तिरेखा, आशयसंपन्न कथेचा गाभा आणि हळुवार व मार्मिक विनोदशैली हे सर्व या कादंबरीतही प्रत्ययास येते.
Reviews
There are no reviews yet.