रामायण एक रूपं अनेक
₹500.00
लेखक : सानिया
तुमच्यासाठी रामायणाचं जीवनात स्थान काय आहे?
जीवनमूल्यांविषयी मार्गदर्शन करणारं धर्मशास्त्र?
की, आध्यात्मिक अनुभूती देणारा ग्रंथ?
की, शहाणपण देणारं ज्ञान-भंडार?
की, मनोरंजन करणारी कथा?
की, हे सर्व काही एकत्रितपणे मिळवण्याचा विचक्षण स्रोत ?
भारतासह संपूर्ण आशिया खंडातल्या विविध संस्कृती आणि सभ्यतांमधल्या पिढ्या पिढ्यांवर रामायणाने मोहिनी घातली आहे. मौखिक परंपरा, हस्तलिखितं यांपासून ते अत्याधुनिक लेखनापर्यंत सर्व लेखक-कवींनी आणि कथाकथनकारांनी आपल्याला रामायणातील व्यक्तिरेखांकडे विविध दृष्टिकोनांतून पाहण्याची मौलिक दृष्टी दिली आहे.
या पुस्तकात पुराकथातज्ज्ञ आनंद नीलकंठन यांनी मूळ वाल्मिकी रामायणातील रामकथा तर सांगितली आहेच, पण त्याबरोबरच त्यांनी त्या अनुषंगाने असलेल्या इतर मौखिक परंपरेतल्या कथा, लोककथा, त्यांमधली तत्त्वं, त्यामागचे विचार यांचं रसाळ पुनर्कथनही केलं आहे. शिपल्यातून अलगद मोती काढावा तसे या कथांमधून मिळणारे धडे, जीवन-शिकवणी कालसुसंगत करून त्यांनी आपल्या हातावर ठेवल्या आहेत.
रामायणाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणारं, तुमची जाण आणि आकलन अधिक समृद्ध करणारं पुस्तक… रामायण एक , रूपं अनेक
















Reviews
There are no reviews yet.