प्रज्ञावंत २ : परदेशी

225.00

मानवी जीवन समृद्ध करणारे


छबिलदास मुलांची शाळा, दादर इथे साहाय्यक शिक्षक म्हणून काम केल्यानंतर अरविंद वैद्य यांनी नंदादीप विद्यालय, गोरेगाव या शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी मुंबई चळवळीच्या कामासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आजपर्यंत ते आजपर्यंत लाल निशाण पक्षाचे सदस्य आहेत. माध्यमिक शिक्षक संघटनेत १९७१ पासून ते सक्रिय आहेत. १९९५ सालापासून ते देशव्यापी शिक्षण हक्क चळवळीत क्रियाशील असून स्त्री-मुक्ती संघटनेत तिच्या स्थापनेपासून सहभागी आहेत. ते 'प्रेरक ललकारी' या नियतकालिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य असून महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, प्रहार, दिव्य मराठी आदि दैनिकांतून आणि पालकनीती, प्रेरक ललकारी आदि नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने लेखन केलेलं आहे.

गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट…

* खिस्तोफर कोलंबस * वास्को-द-गामा
* फर्डिनंड मॅगेलेन आणि कॅप्टन जेम्स कुक
* गॅलिलिओ गॅलिली * आयझॅक न्यूटन * अल्बर्ट आईनस्टाईन
* बेंजामिन फ्रँक्लिन * जॉर्ज वॉशिंग्टन * थॉमस जेफर्सन
* अब्राहम लिंकन * सुकार्नो * नेल्सन मंडेला * कार्ल माक्र्स
* व्लादिमीर लेनिन * माओ-त्से-तुंग * हो-चि-मिन्ह
* चे गव्हेरा * फिडेलकॅस्ट्रो


Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.