मी झेंडे… इन्स्पेक्टर झेंडे
₹320.00
लेखक : मधुकर झेंडे (निवृत्त असिस्टंट पोलिस कमिशनर)
अनुवाद : प्रणव सखदेव
असिस्टंट पोलिस कमिशनर म्हणून निवृत्त झालेल्या मधुकर झेंडे यांची एक ओळख आहे ती सीरियल किलर चार्ल्स सोभराजला बेड्या घालणारा, तसंच १९९३च्या मुंबई दंगलींमध्येही शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची कामगिरी बजावणारा अधिकारी म्हणून…
पण झेंडेंकडे सांगण्यासारख्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेत… गुन्ह्यांच्या, त्यांच्या तपासाच्या आणि न्याय मिळवून देण्याच्या. या पुस्तकामधून सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या मुंबईतल्या गुन्हेगारी जगताची आणि पोलिसी तपासकार्याची ते सखोल ओळख करून देतात.
शांता देवी खून खटल्यापासून प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या अपहरणापर्यंत आणि हाजी मस्तान, करीम लाला, अरुण गवळी, बाबू रेशीम यांसारख्या गुंडांना अटक करण्यापर्यंत अनेक केसेसचा प्रत्यक्ष अनुभव ते या पुस्तकातून कथन करतात.
कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांना आणि समाजकंटकांना योग्य तो धडा शिकवणाऱ्या बुद्धिमान, सेवातत्पर आणि न्यायनिष्ठ ‘सुपर-कॉप ‘ने सोडवलेल्या केसेसचा थरारपट…
















Reviews
There are no reviews yet.