लक्ष्मी पांडा
Sale₹295.00 ₹340.00
नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा
लेखक : सॅवी कार्नेल
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव
दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेश होरपळून निघत असताना चौदा वर्षांची लक्ष्मी तिच्या आई-वडिलांना गमावते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला भारताला स्वतंत्र करण्यासाठी, अथक प्रयत्नांनंतर ती आझाद हिंद फौजेच्या ‘झाशीची राणी’ पलटणीत भरती होते… वयाने सगळ्यात लहान सैनिक म्हणून…!
ही धाडसी मुलगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल हेर होण्यापर्यंत मजल मारते. लहानखुऱ्या चणीची लक्ष्मी आपल्या हुशारीच्या जोरावर, अनेक अडथळे पार करत ब्रिटिशांच्या छावणीपर्यंत पोचते…
महत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या मोहिमेवर…!
या मोहिमेत ती कधी मोठ्या संकटांतून वाचते, तर कधी तिला अत्यंत भीतिदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण ती देशासाठी लढत राहते…
या प्रवासात तिला स्वतःच्या खंबीरपणाची, चिवटपणाची आणि धाडसाची नव्यानेच ओळख होते…
काळाच्या पडद्याआड गेलेल्या या वयाने सर्वात लहान हेराची, तिच्या धाडसाची, तिच्या त्यागाची, तिच्या संघर्षाची…
लक्ष्मी पांडा हिची प्रेरक कहाणी…
















Reviews
There are no reviews yet.