कापडावरील कलाकुसर
₹125.00
विणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं . त्यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत .
कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात.
भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल.
या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत.
Reviews
There are no reviews yet.