

फ्रेंच मेनिॲक
₹295.00
लेखक : पंकज भोसले
स्थळकाळाचं भान येण्यासाठी महापुरुषांच्या कथा उपयोगी नाहीत. नगण्य जीवांच्या जगण्यातून, क्षुल्लक जिंकण्यातून, फालतू पराभवांतून समाज नावाची गोणपाटसदृश वस्तू विणली जाते.
मुंबई महानगराच्या वेशीवर डोंबिवली-बदलापूरसारखी उपनगरं असतात. त्यात तितकेच सामान्य लोक राहतात. महानगराला हलवून टाकेल इतकं कर्तृत्व त्यांच्यात नसतं, ते अंतर्बाह्य ‘मिडिओकर’ असतात. त्यांच्या आयुष्यावर फ्रेंच पॉर्नस्टारपासून जागतिक सिनेमापर्यंत गोष्टी आदळतात. तेव्हा हे लोकही बदलतात. पण सामान्यांचे असामान्य होत नाहीत. एकटेपणा, समाजात राहून समाजापासून तुटल्याची त्यांची अवस्था तशीच राहते.
पंकज भोसलेंनी आपल्या पत्रकारितेत टिपलेल्या व्यक्ती-घटनांवर या कादंबरीचे कथानक बेतलेले आहे. त्यातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा शेवटी विशिष्ट ठिकाणी जाऊन पोहोचतात. ‘मिडिओकर’ असण्याचा त्यांच्या गंतव्यस्थळाशी संबंध आहे. पण वाचकाला त्यांच्याबद्दल राग येत नाही, कणव येत नाही, आपलेपणाही वाटत नाही. ते तिथे आहेत, आणि त्यांची गोष्ट प्रचंड ऐकण्यासारखी आहे, ही भावना दाटून येते. शिवाय आपलं स्थळकाळाचं भान वाढतं. -आदूबाळ
Reviews
There are no reviews yet.