भूमिपुत्र
Sale₹500.00 ₹600.00
लेखक : राजा मंगळवेढेकर
कर्जबाजारीपणा आणि त्यातून निर्माण होणारी दैन्यदुर्दशा यांच्या कचाट्यात महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा शेतकरी सापडला होता.
अशा कठीण परिस्थितीत सावकारशाही व नोकरशाही यांचा क्रूर खेळ अनिर्बंधपणे चालू होता. अशा काळात व वातावरणात विखे पाटील वयात आले. अनुत्पादक कर्ज दुर्लक्ष करून वाढत ठेवल्याने शेती व शेतकरी दोन्हीही संकटात येतात; त्यासाठी मनाची शिस्त व निर्धारी स्वभावाची गरज आहे हे त्यांनी जाणले. एवढेच नव्हे तर आचरणातही आणले. कष्टकरी माणसाबद्दलची सहानुभूती, निःपक्षपातीपणा, निःस्वार्थीपणा या गुणांमुळे ते गावचे नेते बनले.
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी व त्यानंतर प्रगती ऐवजी पिळवणुकीचा एक नवा संघर्ष उभा राहतो की काय अशी परिस्थिती कृषी-औद्योगिक क्षेत्रात उभी राहिली होती.
आपल्या गावी पहिली सहकारी सोसायटी सुरू करण्यात आपल्या गावी पहिली सहकारी सोसायटी सुरू करण्यात आणि पुढे पहिल्या सहकारी साखर कारखान्याची प्रतिष्ठापना करण्यात पुढाकार घेऊन विखे पाटलांनी हा संघर्ष तर टाळलाच, पण द्रष्टेपणही दाखवले.
यशवंतराव चव्हाण
















Reviews
There are no reviews yet.