चतुर
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.
साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी…
चतुर
खरंतर गोष्ट आहे तशी साधी…
एका नवख्या लेखकाची इच्छा असते की,
मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं.
पण तसं काही घडत नाही, तो मरतो..
मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण !
आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी….
आता काय? तिला पडतो प्रश्न.
मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता
ती स्वत:देखील लिहू लागते…..!
तर ही गोष्ट आहे तशी साधी –
मरणाची… आठवणींची… प्रेमाची… बालपणाची….
वयात येण्याची… मोठं होण्याची… तिची… त्याची….
आणि
काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची…!