करामत धाग्या-दोऱ्यांशी

वस्त्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा बहुपदरी मागोवा व त्यातील विज्ञान


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.

कोणत्या मोसमात कोणती वस्त्रं वापरायची, हे ते वस्त्र ज्या धाग्यांपासून तयार होतं त्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. हे गुणधर्म कोणते, त्या धाग्यांची रचना कशी असते, त्यापासून वस्त्रं कशी विणली जातात, ती कशी रंगवली जातात, त्यावर छपाई कशी केली जाते, कोणत्या प्रक्रिया होतात, आदी अनेक गोष्टींची रंजक माहिती या पुस्तकात सहजसोप्या भाषेत देण्यात आली आहे.

ई-टेक्स्टाइलसारख्या आधुनिक काळातल्या चलाखतंतूंचा म्हणजेच ‘स्मार्ट फायबर्स’ चाही अंतर्भाव यात करण्यात आला आहे. तसंच समृद्ध अशा भारतीय वस्त्रपरंपरेचा वेधक मागोवाही घेण्यात आला आहे. याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची निगा कशी राखावी, अशा उपयुक्त माहितीचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
वस्त्रांचा इतिहास कथन करणारं, त्याविषयीचं कुतूहल शमवणारं आणि त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारं पुस्तक…
करामत धाग्या-दोर्‍यांची!


250.00 Add to cart

आकर्षक विणकाम

लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार


लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासाली , त्यांत प्राविण्य मिळविले . छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसीत होत गेली . नव - नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत .

लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.
प्रमुख वैशिष्टये :
१. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू
२. लोभस नाजूक विणी
३. आकर्षक रंगसंगती
४. सोप्या शैलीतील लिखाण
५. जास्तीत जास्त सू्चना
६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र


Learning knitting with 2 needles


100.00 Add to cart

कापडावरील कलाकुसर


विणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं . त्यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत .

कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात.
भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल.
या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्‍या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत.


125.00 Add to cart

क्रोशाचे विणकाम भाग – २

एका सुईवरील लोकरीचे नावीन्यपूर्ण विणकाम


विणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं . त्यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत .

योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपरी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.


100.00 Add to cart

लेटेस्ट हेअरस्टाइल्स


माया परांजपे यांनी रसायनशास्त्रात बी.एस्सी. पदवी घेतली. 'ब्यूटी थेरपी' विषयाचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७५ साली लंडनच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ नॅचरल ब्युटी थेरपीचा एक वर्षाचा अभ्यासक्रमही त्यांनी पुरा केला. १९७६मध्ये 'ब्रिटीश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटालॉजी' संस्थेचे सभासदत्व त्यांना मिळालं. १९७६पासून त्यांनी सौंदर्यप्रसाधनांचं उत्पादन सुरू केलं. त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी लागणार्याल वनस्पतिजन्य सौंदर्यप्रसाधनांचा उत्पादन व्यवसाय त्यांनी ऊर्जितावस्थेत आणला. त्यांनी स्त्रीसौंदर्य संवर्धनाचा सखोल अभ्यास केला असून त्या या विषयावर त्या अधिकारवाणीने बोलू शकतात.

फॅशनचा व्यक्तिमत्त्वावर नक्कीच चांगला परिणाम होतो. केशरचना (हेअरस्टाइल्स) ही फॅशन मधील एक महत्त्वाची बाब! म्हणून त्या विषयावर असणारे पुस्तकसुद्धा महत्त्वाचेच ठरते. केशरचनेच्या साहाय्याने सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्त्व कसे संपादन करता येईल याचे शास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकांत केले आहे.


100.00 Add to cart

लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या


‘अन्नपूर्णा’ हे मंगला बर्वे यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक जरी असलं तरी त्यांच्यातली ‘पूर्ण अन्नपूर्णा’ उलगडली गेली, ती रोहन प्रकाशनात... १९८३ मध्ये रोहन प्रकाशनाने त्यांचं ‘फ्रिज-ओव्हन-मिक्सर : त्रिविध पाककृती’ हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यानंतर मंगला बर्वे यांनी २० पुस्तकं ‘रोहन’साठी लिहिली आणि ती वाचकप्रिय ठरली.

मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे
या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.


95.00 Add to cart

स्वानुभवी शिवणकला


१९५८-१९५९मध्ये एक वर्षाचा सरकारी शिवणकलेचा कोर्स पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मंगला राजवाडे यांना त्याची दोन बक्षिसेही प्राप्त झाली आहेत. त्यांनी ४२ वर्षं शिवणकलेचे वर्ग चालवले असल्याने शिवणकलेचा त्यांना मोठा अनुभव आहे.

४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंगला राजवाडे या शिवणकलेत जशा पारंगत आहेत, याचप्रमाणे शिवणकाम शिकविण्याची कलाही त्यांना चांगली अवगत आहे. म्हणूनच त्यांचे हे पुस्तक शिवणकला शिकणार्‍यांसाठी वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.
या पुस्तकात त्यांनी स्त्रिया, पुरुष व लहान मुलं यांच्या कपडयांचे अनेकविध प्रकार दिले आहेत. सर्व माहिती सविस्तरपणे, आकृत्यांसह व सोप्या पद्धतीने सांगितली आहे. त्याबरोबर मापेही काटेकोरपणे दिलेली आहेत.
शिवणकला अवगत असणे केव्हाही चांगले. त्यासाठी हे पुस्तक आपणास उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करेल एवढे निश्‍चित!


180.00 Add to cart